कानाचे ऑपरेशन :

  • कानाच्या शस्त्रक्रिया १००% यशस्वी होतील याची खात्री देता येत नाही. ५ ते १०% रुग्णांना परत शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासू शकते.
  • ज्या रुग्णांना कानाच्या पडद्याच्या छिद्रासंबंधीत शस्त्रक्रिया केली आहे त्यांना शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची कल्पना २/३ महिन्यांनी होते. हा नॉर्मल रिकव्हरीचा भाग आहे.
  • ज्या रुग्णांच्या कानातील कुजलेल्या हाडाचे ऑपरेशन झालेले असते अशा रुग्णांना कानातून अंदाजे ३ महिन्यापर्यंत रक्त मिश्रीत स्राव येऊ शकतो, हाडाच्या ऑपरेशन झालेल्या रुग्णांना ऐकण्यासंबंधी सुधारणेबाबत खात्री देता येत नाही.

ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी :

  • आंघोळीच्या वेळी कानामध्ये कापूस व व्हॅसलीन यांचा बोळा कानात घालून मगच आंघोळ करावी. पाणी कानात जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी
  • कान धूवू नये. शिंका, खोकला टाळा. ५-१५ दिवस आराम मोठा आवाज, गोंगाट टाळा २ महिने विमान प्रवास टाळा धुम्रपान, पोहणे, जड काम, वजन उचलणे टाळा. अधिक त्रासावेळी डॉक्टरांना दाखवा.

आहार :

  • थंड, तिखट, मसालेदार, वातूळ, कडक, गरम पदार्थ टाळा.

नाकाचे ऑपरेशन :

  • नाकातून लालसर रंगाचे पाणी गळते, त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही
  • नाकात पट्टी टाकल्यामुळे डोळ्यातून पाणी गळते, डोके जड होणे अथवा घशाला कोरड पडणे ही लक्षणे उदभवू शकतात. त्याबाबत काळजी करु नये,
  • नाकाचे कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन झाल्यावर दर पाच दिवसांनी २/३ वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • नाकाच्या ऑपरेशन नंतर नाकातील संधी नाजूक झालेल्या असल्याने सदरवेळी नाक शिकरु नये अथवा श्वारा जोराने ओढू नये. त्यामुळे रक्तस्राव होण्याची
    भिती असते,

ऑपरेशन नंतर घ्यावयाची काळजी :

  • गर्दीचे ठिकाणे व धूळयुक्त वातावरणात जाणे टाळणे,
  • शिंका, खोकला व मद्यपान, धुमपान टाळा.

आहार :

  • मऊ व कमी तिखट पदार्थ खावे

टॅन्सीलस् / घसा :

  • ७ दिवस गरम, मसालेदार, कडक, तिखट पदार्थ खाऊ नये.
  • ७ दिवस थंड, मऊ, गोड पदार्थ खावे
  • १-२ आठवडे ऑफिस/शाळेतुन सुट्टी घ्यावी.
  • भरपूर पाणी, ज्युसेस प्यावीत.
  • वर ४/५ अर्ध्या तासने थंड पाण्याने गुळण्या कराव्या..
Dr. Mukesh More|ENT Specialist in Nashik|ENT Hospital in Nashik

आहार :

  • १ ला दिवस – आईस्क्रिम, सरबते, मिल्कशेक्स, फळांचे रस व थंड दूध ।
    २ रा दिवस – थंड दुधामध्ये बुडवून ब्रेड, बिस्किटस्, पातळ खव्याची खीर व साबुदाण्याची पेज
    ३ रा दिवस – मऊ भात, खिचडी, पोळी, फुलका, चपाती, वरण किंवा दुधामध्ये काला करुण खाणे.

दात काढल्यानंतरची काळजी :

  • पहिल्या १ ते २ तास कापसाचा बोळा घट्ट दाबुन ठेवा.
  • २ ते ४ दिवस पातळ, नरम पदार्थ खावे.
  • २ ते ४ तासानंतर बर्फ लावावा..
  • वेळेवर औषधी घ्यावी व मुख स्वच्छता राखावी.

?आपण केव्हा घोरतो ? ?

तसंच पाहिलं तर सर्वच जण घोरतात. पण कोणी ते कबूल करायला तयार नसतो. तसा सबळ पुरावा दाखवून ते कबूल करून घेणंही सोपं नसतं. कारण माणूस घोरतो ते झोपेत. त्या वेळी त्याला आजूबाजूच्या जगाचं भानच नसतं. त्याला उठवलं तर तो घोरत होता याचा पुरावाच नष्ट होतो. तरी बरं अलीकडे अँड्रॉइड वगैरे प्रकारच्या मोबाइल फोनवर कोणाचाही साग्रसंगीत व्हिडिओ घेण्याची सोय आहे. त्याचा वापर करून माणूस घोरी घराण्याचा सदस्य असल्याचं सिद्ध करता येतं.
माणूस गाढ झोपलेला असताना घोरतो हे तर स्पष्टच आहे. तरीही नेमकी कोणती परिस्थिती त्याच्या घोरण्याला कारणीभूत होते हेही समजून घेतलं, तर तो केव्हा घोरतो हे स्पष्ट होईल. झोपेत असताना आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. आपल्या घरातील अवयवांचं नियंत्रण करणाऱ्या स्नायूंचीही तीच स्थिती असते. त्यामुळे मऊ टाळू, जीभ, पडजीभ वगैरे अवयवांची या नियंत्रणापासून सुटका होते. त्याच वेळी श्वासनलिकाही सुस्तावल्यामुळे अरुंद झालेली असते. ज्या वेळी आपण श्वास घेतो तेव्हा तो या अरुंद श्वासनलिकेतून आत जाण्याचा प्रयत्न करतो. त्याला अर्थात त्या अरुंद नलिकेकडून विरोध होतो. त्याचा परिणाम जवळच्या मृदू अवयवांवर पडून ते फडफडू लागतात. त्यांचाच जोराचा आवाज होतो. तोच आपल्याला घोरण्याच्या स्वरूपात ऐकू येतो. कधीकधी सर्दीमुळे किंवा अशाच काही कारणांमुळे नाक चोंदलेलं असतं. त्यातून वाट काढणाऱ्या श्वासालाही विरोध होतो. त्यावर मात करण्यासाठी हवेला जास्त जोर लावावा लागतो. परिणामी हवेचा प्रवाह सुरळीत होण्याऐवजी खळबळल्यासारखा होतो. त्या खळबळीपोटी घशातल्या मृदू अवयवांची फडफड होते. माणूस घोरायला लागतो.
घोरण्याचा केवळ इतरांना त्रास होतो असं नाही. तर घोरणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होत असतो. कारण घोरण्यामुळे बर्‍याच वेळा झोप चाळवली जाते. काही वेळा तर जागही येते. परत झोप लागणं कठीण होतं. व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे उठल्यावर माणूस तेवढा ताजातवाना राहू शकत नाही.
जसा खोकला हा आजार नाही तर ते केवळ लक्षण आहे, तसंच घोरणंही हा आजार नाही. तेही एक गंभीर ठरू शकणाऱ्या आजाराचं लक्षण आहे. कधीकधी झोपेत असताना श्वासोच्छ्वासाला अडथळा होतो. याला अाॅब्स्टक्ट्रिव्ह स्लीपअॅंप्निया म्हणतात. झोपेत असल्यामुळे या अडथळ्याचं रूपांतर श्वासोच्छ्वास थांबण्यात कधी होतं ते कळतही नाही. तसं झाल्यास जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर वेळीच उपाय करणं आवश्यक असतं. त्यामुळे अतिघोरणं होत असेल व त्यातून झोप वरचेवर चाळवली जात असेल तर डॉक्टरी तपासणी करून घेणं हिताचं ठरतं.

टॅन्सीलस् / घसा :

उपलब्ध सुविधा।

    •  लेझरद्वारे कानाच्या व नाकाच्या शस्त्रक्रिया.
    • मायक्रोस्कोप द्वारे कानाची बिन टाका शस्त्रक्रिया.
    • एन्डोस्कोपद्वारे सायनस आजाराचे निदान व शस्त्रक्रिया.
    • नाक, चेहरा व दातांच्या सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया.
    • वर्टीगो निदान व उपचार.
    • बहीरेपणा तपासणी व श्रवणयंत्र उपचार.
    • हेड-नक कॅन्सर, पॅरोटीड, थॉयराईड निदान व उपचार.
    • घोरण्याच्या आजारांचे उपचार.
    • स्वरयंत्र व आवाजाच्या आजारांवर उपचार.
    • बिनटाका नासुर शस्त्रक्रिया.
    • व्हटींगो क्लिनीक.
    • अत्याधुनिक दंतचिकीत्सकउपचार.
    • रुट कॅनल ट्रिटमेंट व क्लिनिंग व ब्लिचींग.
    • रिमोवेबल डेंचर्स.
    • दातांची व हिरड्यांची.
    • स्माईल डिझाईन.
    • जनरल व लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया.
    • लेझरद्वारे पाईल्स शस्त्रक्रिया.
    • लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया.
    • सुसज्य प्रसुतिगृह ।.
    • सुसज्य ऑपरेशन थिएटर.
    • वंध्यत्व निदान व उपचार.
    • नाकाची व चेह-याची प्लॅस्टिक शस्त्रक्रिया.
    • हॅन्ड व मायक्रोव्हॅस्कुलर शस्त्रक्रिया.
    • वेरीकोज व्हेन शस्त्रक्रिया.
    • सर्वांगीण परिपूर्ण ऑपरेशन थिएटर.
    • डिब्रायडर, इलेक्ट्रोकॉटरी.
    • एण्डोस्कोपी युनिट.
    • मायक्रोस्कोप.
    • ऑक्युलोप्लास्टीक शस्त्रक्रिया.

मेडिक्लेम संदर्भात रुग्णांसाठी महत्वाच्या सुचना :

  • बाह्यरुग्ण तपासणी व किरकोळ आजारासाठी मेडिक्लेमचा वापर करू नका ह्यामुळे गंभीर आजाराच्या वेळेस क्लेम पास करताना अडचण येऊ शकते.
  • आमच्या रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या खोट्या मेडिक्लेम केसेस घेतल्या जात नाहीत त्या संदर्भात चौकशी सुद्धा करू नये.
  • अत्यावश्यक सेवेसाठी उपचार करताना जर मेडिक्लेम पास झाला नाही तर या संदर्भातील संपूर्ण हॉस्पिटल बिल रुग्णास भरावे लागेल.
  • मेडिकल संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता रुग्णास करावी लागेल.
  • लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता रुग्णाने केल्यास तेवढ्या लवकर क्लेम पास होण्यास मदत होईल.
  • मेडिक्लेम नामंजूर झाल्यास हॉस्पिटलमध्ये पेशंट जितके दिवस राहिले याचे हॉस्पिटल बिल रुग्णास भरावे लागेल.
  • मेडिक्लेम कंपनीकडे पाठविल्यानंतर त्याची कार्यवाही २४ तासात होते त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यासाठी घाई करू नये. विमा कंपनीची संमती असल्याशिवाय शस्त्रक्रिया किंवा उपचार करता येत नाही. (अत्यावश्यक सेवा वगळून त्यासंदर्भात रुग्णालय कर्मचा-यांची संवाद वाद घालू नये.
  • २४ तास हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल कारण विमा कंपनीचे प्रतिनिधी तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात त्यामुळे २४ तास अगोदर भरती राहून विमा कंपनीची संमती आल्यावर त्यावर उपचार करण्यात येईल त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी घाई करू नये.


स्वत: साठी सर्वोत्तम काळजी घेणारेआपले रुग्णालय निवडा.